Contact us:

आपल्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल आपले मनोमन आभार! लवकरच आपल्या दुकानातील सर्व साहित्याच्या याद्या आपणास आवश्यक फोटो व डेमोसह उपलब्ध करून दिल्या जातील. सर्व साहित्य पोस्टाने व कुरियरने पाठवण्याची मोफत सुविधा उपलब्ध असल्याने आमचे ग्राहक संपूर्ण महाराष्ट्रातून घरबसल्या खरेदी करू शकतात! आपण तर लाभ घ्याच पण सोबतच आपल्या सर्व मित्रपरिवाराला व प्रियजनांना देखील आपल्या वेबसाईटबद्दल माहिती द्यावी ही नम्र विनंती. आपलेच : विजय स्टोअर्स - शैक्षणिक साहित्याचे माहेरघर!!! अधिक माहितीसाठी आम्हाला 8275336780 किंवा 9404328832 या क्रमांकावर संपर्क साधावा. आम्ही आपल्या सेवेस सदैव तत्पर आहोत. तुमच्यासाठी काही पण! विजय स्टोअर्स - सर्वोत्तम शिक्षणासाठी आग्रही!


कृषी विद्यापीठ

सुस्वागतम मित्रांनो!

                               दापोलीत आलात की सर्वप्रथम भेट द्या आमच्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला! कृषी क्षेत्रात आमुलाग्र असे बदल घडवणाऱ्या या विद्यापीठाचा परिसर अत्यंत सुंदर व प्रशस्त आहे. विद्यापीठाच्या अनेक शाखा असून सर्व शाखांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ महाराष्ट्राच्या दापोली गावातील कृषी विद्यापीठ आहे. याची स्थापना १८ मेइ.स. १९७२ रोजी कोकण कृषी विद्यापीठ नावाने झाली व १२ फेब्रुवारीइ.स. २००१ रोजी याचे पुनर्नामकरण केले गेले.

               दापोली थंड हवचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. दापोलीला आल्यावर कोकण कृषी विद्यापीठाला आवर्जुन भेट द्यावी. 1972 मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठात कृषी क्षेत्राशी निगडीत अनेक नवे प्रयोग अचंभीत करणारे तेवढेच शेतीत रुची असणाऱ्यांसाठी उपयुक्त आहेत. विद्यापीठातील विविध उद्यानांची रचनादेखील तेवढीच सुंदर आहे. विद्यापीठाच्या माहिती केंद्रात कृषी प्रदर्शन पाहता येते.दापोली परिसरातील फळबागांचा उपयोग करून अनेक ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रे विकसीत करण्यात आली आहेत. या पर्यटन केंद्रांमधून झाडावरून नारळ काढणे, जलक्रीडा, बैलगाडीची सफर, कलम करणे, नारळ सोलणे, चूलीवर स्वयंपाक करणे, रात्री जाखडी खेळणे, कोकणी भोजन प्रकार आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. कृषी पर्यटन केंद्रात दिवस घालविल्यास 'कोकणी लाईफस्टाईल'ची मजा लुटता येते. 

             विद्यापीठाला भेट देणाऱ्या अभ्यासू शेतकरी व पर्यटक मित्रांसाठी अत्यंत माफक दरात येथील किसान भवनात राहण्याची उत्तम सोय केलेली आहे.

No comments:

Post a Comment