Contact us:

आपल्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल आपले मनोमन आभार! लवकरच आपल्या दुकानातील सर्व साहित्याच्या याद्या आपणास आवश्यक फोटो व डेमोसह उपलब्ध करून दिल्या जातील. सर्व साहित्य पोस्टाने व कुरियरने पाठवण्याची मोफत सुविधा उपलब्ध असल्याने आमचे ग्राहक संपूर्ण महाराष्ट्रातून घरबसल्या खरेदी करू शकतात! आपण तर लाभ घ्याच पण सोबतच आपल्या सर्व मित्रपरिवाराला व प्रियजनांना देखील आपल्या वेबसाईटबद्दल माहिती द्यावी ही नम्र विनंती. आपलेच : विजय स्टोअर्स - शैक्षणिक साहित्याचे माहेरघर!!! अधिक माहितीसाठी आम्हाला 8275336780 किंवा 9404328832 या क्रमांकावर संपर्क साधावा. आम्ही आपल्या सेवेस सदैव तत्पर आहोत. तुमच्यासाठी काही पण! विजय स्टोअर्स - सर्वोत्तम शिक्षणासाठी आग्रही!


दापोली पर्यटन:

दापोली पर्यटन

एक अनोखा आनंद...

                             आमच्याा दापोली तालुक्याला निसर्गाने अप्रतिम सौंदर्य बहाल केले आहे. त्याचबरोबर तालुक्याला समृद्ध असा ऐतिहासिक व सांस्कृतीक वारसा लाभला आहे. त्यामुळेच आमच्या www.vijaystoresdapoli.blogspot.com या वेबसाईटवर दररोज ऑनलाईन खरेदी करणाऱ्या महाराष्ट्रातील आमच्या हजारो पर्यटनप्रेमी ग्राहकांना *दापोली पर्यटन क्षेत्राची परिपूर्ण माहिती एका क्लिकवर* उपलब्ध करुन देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न. त्याकरिता आम्हाला *आपल्या दापोलीकरांचे सहकार्य अपेक्षित* आहे. तुमच्याकडे उपलब्ध *दापोली तालुक्यातील पर्यटनस्थळांची माहिती, फोटो* आमच्याशी 8275336780 या whatsapp नंबरवर *किंवा* vijaystoresdapoli@gmail.com या email id वर पाठवा जेणेकरून आपल्या वैभवसंपन्न दापोलीची माहिती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचेल व आपल्या पर्यटन विकासासही तुमच्याकडून हातभार लागेल. आपल्या सर्वांचा नामोल्लेख आपल्या ब्लॉगवर केला जाईल! लिखित मजकुरात काही दुरुस्ती करणे आवश्यक असल्यास तेदेखील आम्हाला या कळवावे ही विनंती.

             हिरव्यागार डोंगररांगांवर ठिपक्यासारखी दिसणारी घरे, मोकळी हवा आणि शहरातून फेरफटका करतांना दिसणारे विविध रंगी पुष्पसौंदर्य हे आमच्या दापोली शहराचे वैशिष्ट्य आहे. शहराच्या गजबजाटापासून दूर निसर्गाचे वरदान लाभलेल्या या शहराचे सौंदर्य पर्यटकांसाठी आकर्षण आहे. थंडगार हवेमुळे हे शहर 'मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाते.पावसाळ्यात दापोली परिसराची भटकंती करताना बहावा, पेव, दयाळू, अग्निशिखा, मधूनच डोकविणारी विविधरंगी जास्वंद अशा अनेक फुलांचे सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडते. समुद्र सपाटीपासून साधारण आठशे फूट उंचीवर असलेले हे शहर इंग्रजांच्या काळात 'दापोली कॅम्प' म्हणून परिचित होते. सुंदर समुद्र किनारे, किनाऱ्यावर हिवाळ्यात येणारे 'सी गल' पक्षी, याच दरम्यान मधूनच घडणारे डॉल्फीनचे दर्शन, समुद्र किनारचा मासोळी बाजार, ऐतिहासिक गड-किल्ले आणि इमारतींसाठी दापोली तालुका प्रसिद्ध आहे. अनेक थोर व्यक्तिमत्वांची खाण म्हणून हा परिसर ओळखला जातो.          आमच्या दापोलीला येण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून म्हाप्रळ-मंडणगड-पालगडमार्गे रस्ता आहे. मंडणगड-दापोली हे अंतर 30 किलोमीटर आहे. मंडणगडहून कोकण भ्रमंती सुरू केल्यास वेळास-केळशी-आंजर्ले-मुरुडमार्गेदेखील दापोलीला येणे शक्य आहे. वेळास-दापोली हा दोन तासांचा प्रवास आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खेड शहरातून दापोली 35 किलोमीटर अंतरावर आहे.

संकलन - विजय स्टोअर्स दापोली

संकलन सहाय्य:
 समस्त दापोलीकर!!!

No comments:

Post a Comment